अजय देवगण बनणार चाणक्‍य…

आतापर्यंत हरतऱ्हेच्या भूमिका साकारणाऱ्या अजय देवगणला आता आर्य चाणक्‍यच्या रोलमध्ये बघण्याची संधी आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एन्टरटेनमेंट आणि फ्रायडे फिल्म वर्क्‍सची कंपनी प्लॅन सी स्टुडिओजने आर्य चाणक्‍यवरच्या सिनेमासाठी अजय देवगणची निवड निश्‍चित केली आहे. निरज पांडेच्या दिग्दर्शनाखाली हा सिनेमा तयार होणार आहे.

राजकीय रणनितीकार, कुशल प्रशासन तज्ञ आणि अर्थतज्ञ असलेल्या या सिनेमामध्ये चाणक्‍यच्या कुशल राजकारण्यासाठीच्या शिकवणूकीवर विशेष भर दिलेला असेल. चाणक्‍य लौकिक अर्थाने योद्धा नव्हता, तर एक शिक्षक होता. आताचे पाटणा अर्थात पाटलीपुत्र राजधानी असलेल्या राज्यावर चंद्रगुप्त मौर्याची सत्ता स्थापन करण्यामध्ये त्याने मोलाची भूमिका बजावलेली होती.

आजच्या काळात चाणक्‍य सारख्या हुशार आणि नितीमान राजकारण्यांची आवश्‍यकता आहे. त्यामुळेच हा रोल आपण आनंदाने स्वीकारला असल्याचे अजय देवगणने सांगितले. नीरज पांडे गेल्या काही महिन्यांपासून “चाणक्‍य’च्या कथेवर काम करत आहे. नीरज पांडेबरोबर अजय देवगणचा हा पहिलाच सिनेमा असेल.

दुसरीकडे अजय देवगण नरवीर तानाजीच्या रोलचीही तयारी करत आहे. तानाजीवरील सिनेमाचे प्रोडक्‍शनही स्वतः अजय देवगणचेच असणार आहे. त्यामध्ये त्याच्याबरोबर काजोलही असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)