अजय देवगण अंबाबाई चरणी, काजोलने देवीची ओटी भरली

कोल्हापूर- प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणने आज सह कुटुंब करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच दर्शन घेतलं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण , त्याची पत्नी सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण याची आई अंबाबाई मंदिरात दाखल झाले. यावेळी अजय देवगण याने सोहळे तर काजोलने पारंपरीक साडी नेसून अंबाबाई मंदिरात प्रवेश केला. यावेळी अजय ने गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेत सपत्नीक देवीला खण, नारळ आणि साडीची ओटी भरली. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने अजय देवगण आणि काजोल यांचा देवीची चांदीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. अजय देवगण देवीच्या दर्शनाला आला आहे अशी बातमी समजतच त्याच्या चाहत्यांनी मंदिर परिसरात तुफान गर्दी केली होती. तर अनेकांची अजय सोबत सेल्फी घेण्यासाठी धडपड सुरु होती.

सर्व फोटो राज माकानदार, कोल्हापूर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)