अजय देवगणचा “तानाजी’ “3 डी’ मध्ये येणार

अजय देवगणने गेल्या वर्षी जुलैमध्ये आपल्या “तानाजी द अनसंग वॉरिअर’ या सिनेमाची घोषणा केली होती. त्याच सुमारास अजयने “तानाजी’चा पहिला लुकही रिलीज केला होता. मात्र त्यानंतर मात्र तो आपल्या प्रॉडक्‍शन हाऊसच्या आणि अन्य सिनेमांच्या अर्धवट राहिलेल्या शुटिंगच्या कामात अडकून गेला होता. त्याने “तानाजी’च्या कामाला थोडे दुय्यम ठेवले होते. मात्र या सिनेमाबाबतचा त्याचा जिव्हाळ्याचा संबंध अजय विसरला नाही.

आता या सिनेमाच्या प्रॉडक्‍शनची जबाबदारी अजयने स्वतःकडे घेतली आहे. नरवीर तानाजीच्या जीवनावरचा हा भव्य सिनेमा “3 डी’ स्वरुपात पडद्यावर आणायचे त्याने ठरवलेले आहे. अजयच्या स्वतःच्या प्रॉडक्‍शन कंपनीने सगळी सूत्रे हातात घेतल्यामुळे आता या सिनेमाच्या प्री प्रॉडक्‍शनचे काम वेगाने सुरू झाले आहे. फिल्मच्या सेटच्या निर्मितीचे काम वेगात सुरू झाले आहे. आगामी काही महिन्यांमध्ये “तानाजी’चे शुटिंगही सुरू होईल, असा अंदाज आहे.

नरवीर तानाजीची मुख्य भुमिका अजय देवगण स्वतःच करणार आहे, हे आगोदरच स्पष्ट झाले आहे. 1670 साली झालेल्या युद्धामध्ये तानाजीने स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन सिंहगड किल्ला मोगलांच्या तावडीतून सोडवला आणि स्वराज्यात आणला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)