अजय गवळीला दोघांनी जबरदस्तीने ऍसिड पाजल्याची बहिणीची तक्रार 

कराड – जुन्या भांडणाच्या कारणावरून अजय गवळी याला रवींद्र सोनावले व त्याच्या साथीदारांनी वारुंजी फाटा (ता. कराड) येथे जीवे मारण्याच्या हेतूने ऍसिड पाजले असल्याची फिर्याद अजय गवळी याची बहीण नीलम अमित बाबर (रा. शिवाजी स्टेडीयम झोपडपट्टी, लक्ष्मीनगर, कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी दाखल केली आहे.

शिवाजी स्टेडीयम झोपडपट्टी, लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या अजय गवळी याने झोपडपट्टीतीलच गौरी पिसाळ या युवतीवर दि. 3 नोव्हेंबर रोजी धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर दि. 5 नोव्हेंबर रोजी अजय अत्यावस्थेत वारुंजी फाटा येथे आढळून आला होता. उपचारादरम्यान दि. 29 नोव्हेंबर रोजी अजय याचा मृत्यू झाला. रवींद्र सोनावले हा वरचेवर शैला पिसाळ यांच्या घरी येत होता.

झोपडपट्टीतील गौरी पिसाळ हिने स्वतःवरच वार करून जखमी करून घेतले होते. जाणीवपूर्वक तिची आई शैला पिसाळ हिने अजयविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. तसेच येथील रुग्णालयात उपचार घेत असताना अजय याला बोलता येत नसल्याने त्याने जबाब दिला नव्हता. त्याने एका कागदावर स्वतःच्या हस्ताक्षरात रवींद्र सोनावले याने जबरदस्तीने ऍसिड पाजल्याचे नमूद केले होते. जुन्या भांडणाच्या कारणावरून अजय गवळी याला जीवे मारण्याच्या हेतूने रवींद्र सोनावले आणि त्याच्या साथीदाराने जबरदस्तीने ऍसिड पाजल्याचे नीलम बाबर हिने फिर्यादीत म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)