अजय-काजोलची जोडी पुन्हा झळकणार 

अभिनेता अजय देवगण सध्या आपल्या आगामी “तानाजी  द अनसंग वॉरियर’ चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे. हा चित्रपट इतिहासकाळीन असल्याने त्यात भव्य सेट, कॉस्ट्यूम्स आणि युद्धाचे दृश्‍य असणार आहेत. यासाठी मुंबईत पाच सेट उभारण्यात आले आहेत. यासाठी तब्बल 7 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आता या चित्रपटातील नायिका निश्‍चित झाल्याचे समजते.
अजय देवगणसाठी हा चित्रपट एक ड्रिम प्रोजेक्‍ट असून या चित्रपटातील एक खास वृत्त हाती आले आहे. ते म्हणजे, या चित्रपटातील नायिकेबाबत. ही नायिका इतर कोणी नसून ती अजय देवगणची पत्नी काजोलच आहे. “तानाजी’त काजोल निर्णायक भूमिका साकारणार असल्याचे समजते. अजय देवगण आणि काजोलची जोडी तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे. यापूर्वी 2008मध्ये प्रदर्शित झालेल्या “यू, मी और हम’ या चित्रपटात या जोडीने एकत्रित काम केले होते.
दरम्यान, “तानाजी’च्या सेटवर काजोल दाखल झाली असून या चित्रपटात अजय देवगणसोबत ती रोमांस करताना दिसणार आहे. पण, अद्याप तिच्या भूमिकेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र, तिची भूमिका ही निर्णायक असणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)