अजयच्या मृत्यूची सखोल चौकशीची मागणी

कराड – अजय गवळी या युवकाला ऍसिड पाजून मारहाण करण्यात आली आहे, असा आरोप करीत नातेवाईकांनी याप्रकरणाची चौकशी करुन संबंधित दोषीला अटक करावी, अशी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांचेकडे नुकतेच देण्यात दिले आहे.

पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवाजी स्टेडियम जवळील झोपडपट्टी येथे अजय गवळी राहत असून त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याने त्याने ऍसिड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. परंतु हे सत्य नाही. अजय गवळी हा युवक ऍसिड पिऊन आत्महत्या करुच शकत नाही. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना त्याने पोलिसांना दिलेल्या लेखी अर्जात त्याने मी स्वत:हून ऍसिड पिलेलो नसल्याचे स्पष्टपणे सांगीतले. मात्र माझे म्हणणे पोलिसांनी ऐकून घेतले नाही. तसेच त्याचा अर्ज देखील पोलिसांनी का स्वीकारला नाही, याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

अजय गवळी यांनी लिहिलेल्या अर्जामध्ये मला मारहाण करुन ऍसिड पाजले व धमकीही देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. ज्यांनी हा प्रकार केला त्याचे नाव पाटण येथील रविंद्र सोनवणे आहे, असाही उल्लेख अजयने लिहिलेल्या अर्जात दिसून येत आहे. असे असताना संबंधित रविंद्र सोनवणे यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

या प्रकरणात अजयला ऍसिड पाजून त्याची हत्या करण्यात आली आहे काय? याचाही उलगडा व्हावा व जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. अन्यथा नाईलाजास्तव जनआंदोलन छेडावे लागेल. त्यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शेकडो लोकांच्या सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)