अजमेर स्फोट प्रकरणातील दोषीचे हिरोसारखे स्वागत

अहमदाबाद – अजमेर दर्गा स्फोट प्रकरणातील दोषी भावेश पटेल याचे गुजरातमधील भडोच शहरात एखाद्या हिरोसारखे स्वागत झाले. त्याच्या स्वागतासाठी जमा झालेल्यांमध्ये स्थानिकांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परिषद आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता.

अजमेरमधील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्‍ती दर्ग्याच्या परिसरात ऑक्‍टोबर 2007 मध्ये स्फोट झाला. त्या स्फोटात तिघे मृत्युमुखी पडले, तर 15 जण जखमी झाले. त्या स्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने मार्च 2017 मध्ये पटेल आणि देवेंद्र गुप्ता यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यानंतर तुरूंगात असणाऱ्या पटेल याला राजस्थान उच्च न्यायालयाने मागील आठवड्यात जामीन मंजूर केला. त्यामुळे पटेल रविवारी भडोच या त्याच्या शहरात दाखल झाला.

तुरूंगात असतानाच स्वामी बनलेल्या पटेलने मुक्तानंद हे नाव धारण केले आहे. त्याच्या स्वागतासाठी भडोचमध्ये विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्या सोहळ्यात भगव्या पेहरावात असणाऱ्या पटेल उर्फ स्वामी मुक्तानंदवर गुलाब पाकळ्यांची उधळण करण्यात आली. आयोजकांनी पुष्पहार घातल्यावर त्याच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. त्या सोहळ्याला नगराध्यक्षांबरोबरच अनेक नगरसेवकांनी हजेरी लावली. भडोच पालिकेत भाजपची सत्ता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)