अजब शोध; नारद त्या काळातील गुगल- विजय रुपाणी

अहमदाबाद:  भाजप नेत्यांचे बेजबाबदार वक्तव्ये करणे काही केल्या थांबतनसल्याचे दिसत आहे. कारण, आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनीदेखीलअसेच एक वक्तव्य केले आहे. नारद त्या काळातील गुगल होते, असा अजब शोध गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी लावला आहे. नारदासारखं व्हा, ते सच्चे पत्रकार होते, असा सल्लाही त्यांनी पत्रकारांना दिला.दरम्यान, काही दिवसापूर्वी महाभारत काळातही इंटरनेट होते, असे विधान त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी केले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माध्यम शाखा विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी नारद आणि गुगल यांची तुलना केली. आताच्या पत्रकारांनी नारदाप्रमाणे केवळ बातमी सांगितली पाहिजे. त्यांचा दृष्टीकोन नाही. नारद केवळ मानवजातीच्या कल्याणासाठी देव आणि दानवांनाही माहिती देत होते, असेही ते म्हणाले. आपण नारदाची तुलना गुगलशी करू शकतो. कारण त्यांच्याकडे जगातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक घटनेची माहिती असायची. त्याचवेळी माहिती देताना ते सावधगिरी बाळगत असत. मानवजातीचे नुकसान न होता, कल्याण होवो, असं त्यांना वाटत असत, असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)