अजनूज सेवा संस्थेच्या उपाध्यक्षासह दहा सदस्य अपात्र

सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांची कारवाई

श्रीगोंदा: कर्जाची मुदतीत परतफेड न केल्याने अजनूज सेवा संस्थेच्या उपाध्यक्षांसह तब्बल दहा जणांना संस्थेच्या संचालकपदावरून अपात्र करण्यात आले आहे. याबाबत सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी आदेश काढला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजनूज येथील नितीन गोरख गिरमकर व अन्य दोघांनी अजनूज सेवा संस्थेचे कर्ज थकीत असणाऱ्या दहा संचालकांवर कारवाई करण्याची मागणी सहायक निबंधक खेडकर यांच्याकडे केली होती. त्याची पडताळणी करून 30 जून 2018 पासून कर्ज थकीत असणाऱ्या दहा संचालककांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

यामध्ये संस्थेचे उपाध्यक्ष अमोल बापूराव गिरमकर, आबासाहेब वामन गिरमकर, नानासाहेब रामदास शितोळे, जालिंदर नामदेव गिरमकर, सदाशिव पर्वती गिरमकर, संतोष भानुदास गायकवाड, लक्ष्मण राऊ थोरात, संपतराव बापूराव खरात, ऊर्मिला संजय गिरमकर, इंदूबाई भीमराव गिरमकर या दहा सदस्यांचा समावेश आहे. सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी हे आदेश काढले. तेरा सदस्य असणाऱ्या अजनूज सेवा संस्थेचे तब्बल दहा सदस्य अपात्र ठरल्याने जिल्हा बॅंकेच्या अजनूज शाखेचे शाखाधिकारी के. बी. लकडे यांची अजनूज सेवा संस्थेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी 21 डिसेंबर 2018 रोजी काढले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)