“अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवून फसवणूक : छगन भुजबळ

ओबीसींना धक्‍का न लावता मराठा आरक्षण हवे

औरंगाबाद: देशात मंदिर, मशीद व राज्यात मराठा-ओबीसींमध्ये फूट पाडून त्यांना मते मिळवायची आहेत. अच्छे दिनची भाषा करून शेतकरी, सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या या सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवा. मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी आमची भूमिका आहे, असे समता परिषदेचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वैजापूर येथे आयोजित समता मेळावा व बहुजन परिषदेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला समता सैनिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भुजबळ यांच्या हस्ते विषमता निर्माण करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करण्यात आले. भुजबळ म्हणाले, साठ वर्षांच्या लढाईनंतर ओबीसींना 27 टक्के आरक्षण मंडल आयोगामुळे मिळाले. पण आता मराठा आरक्षणामुळे या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी आमची भूमिका आहे.

ओबीसींची जनगणना कायद्याच्या चौकटीत न करता 54 टक्के असलेल्या ओबीसींची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची जणगणना करा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच केंद्रातील मोदी सरकार नोटाबंदी, स्मार्टसिटी, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आदी सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. त्यांना आंबेडकरांचे संविधान हटवून हुकुमशाही आणायची आहे, अशी टीका त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)