अचूक वीज बिलांच्या आधारे नवीन कृषि संजीवनी योजना

मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्‍वासन

पुणे- राज्यातील सर्व 41 लाख शेती पंपधारक वीज ग्राहकांची वीज बिले येत्या दि. 15 ऑगस्टपर्यंत तपासून दुरुस्त व अचूक करण्यात येतील. व त्यानंतर अचूक वीज बिलांच्या आधारे नवीन कृषि संजीवनी योजना राबविण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस व उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सचिव प्रताप होगाडे यांनी आज येथे सांगितले. शेती पंपधारक शेतकऱ्यांचा मोर्चा आज विधानभवनावर काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी केले होते.

यावेळी मुख्यंमत्री व उर्जामंत्री यांच्याबराबेर झालेल्या बैठकीत आश्‍वासन मिळाले असल्याचे होगाडे यांनी सांगितले. यावेळी राज्यातील सर्व उपसा सिंचन योजनांची वीज बिले 1.16 प्रति युनिट या दराने भरुन घेतली जावीत, व या सर्व उच्च दाब वीज ग्राहकांच्या बिलांमदील थकबाकी दि. 15 ऑगस्टपर्यंत निकालात काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सर्वपक्षीय मोर्चामध्ये राज्यातील विविध उपसा सिंचन योजनांबरोबरच अन्य वैयक्‍तिक शेती पंपधारक मोठ्या संख्येने सहभागी होते.

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, संघटना सहभागी झालेल्या होत्या. प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, बुलढाणा इ विविध जिल्ह्यातील 10 हजारांहून अधिक शेतकरी आझाद मैदानावर उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्‍त केला. दुपारी तीननंतर विधान भवन येथे दीड तास झालेल्या बैठकीनंतर सायंकाळी मोर्चाची सांगता करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)