अग्निशामक, वाळू लिलावरुन खडाजंगी

म्हसवड पालिका विशेष सभा : पाचपैकी तिन विषय नामंजूर

म्हसवड – सोमवारी झालेल्या म्हसवड पालिकेच्या विशेष सभेत अग्निशामकच्या नादुरस्त वाहन व वाळू लिलावाच्या विषयावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच खंडाजंगी झाली. यावेळी सभेपुढे ठेवण्यात आलेल्या पाचपैकी केवळ दोनच विषयांना एकमताने मंजुरी मिळाली. नगराध्यक्षा तुषार विरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा घेण्यात आली.

-Ads-

सभेच्या सुरुवातीलाच सत्ताधारी गटाचे नगरसेवक दीपक बनगर यांनी पालिकेच्या नादुरुस्त असलेल्या अग्निशामक वाहनाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बनगर म्हणाले, नगरसेवकांना विचारात न घेता वाहन दुरुस्तीसाठी पाठवलेच कसे? यावर विरोधी गटातील नगरसेविका तेजस्विनी सोनवणे यांनीही हा मुद्दा उचलून धरत अग्निशामक बंबाच्या बदल्यात पालिकेने कोणती पर्यायी व्यवस्था केली होती, याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. या गदारोळामुळे या विषयाच्या मंजुरीसाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये सत्ताधारी पाच सदस्यांनी हात वर करत या विषयास पाठींबा दर्शविला तर विरोधी सहा नगरसेवक व एका सत्ताधारी नगरसेवकाने या विषयास पाठींबा न दिल्याने हा विषय नामंजूर करण्यात आला.

यावेळी वाळू लिलावाच्या विषयावरुनही सभेत खडाजंगी झाली. वाळू लिलावाचा विषय सभेपुढे येताच नगरसेवक काझी म्हणाले, तहसीलदार यांनी वाळू लिलावासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे पत्र दिले आहे. परंतु, या पत्राचाला पालिकेशी संबंध असेल तर आमची हरकत नाही, तसेच हे पत्र रितसर पालिकेच्या नावाने आहे याचाही प्रशासनाने खुलासा करावा, मगच निर्णय घ्यावा. असे सांगताच याविषयासाठीही पुन्हा मतदान घेण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या मतदानानंतर हा विषयही नामंजूरच झाला.

तिसरा विषयही वाळूसंदर्भातच असल्याने पालिकेच्या विकासाचे विषय घ्या असा मुद्दा मांडत हाही विषय नामंजूर करण्यात आला. या नंतरच्या विषयामधील तीर्थक्षेत्र विकास निधीतून विविध कामाचे प्रस्ताव करण्यावरून व पर्यटन विकासयोजने अंतर्गत विविध विकास कामाचे प्रस्ताव करणे हे दोन विषय सर्वानुमते मंजुर करण्यात आले. मात्र, आगोदर या विकासकामाचा शिल्लक असलेला निधी पालिकेने खर्च करावा व नंतर नवीन प्रस्ताव करावेत, अशी उपसुचना करत हे विषय मंजुर करण्यात आले.

यावेळी विरोधी नगरसेवक डॉ. मासाळ म्हणाले, पालिकेच्या बहुउद्देशीय हॉलची काय परिस्थिती आहे ती सभागृहाला सांगावी. तसेच जनतेच्या विकासासाठी आलेले हे पैसे माघारी जाण्याची नामुष्की पालिकेवर येवू देवु नका, ते निधी शिल्लक असलेली विकासकामे करा अशा सुचना मांडल्या.
यावेळी सत्ताधारी पार्टीतील नगसेवक गणेश रसाळ, दीपक बनगर, संग्राम शेटे, नगरसेविका श्रीमंत सौ हिंदमालादेवी राजेमाने, सौ सविता माने, कलाबाई पुकळे, हे तर विरोधी नगरसेवक डॉ. वसंत मासाळ, अकिल काझी, रणजित येवगे, विकास गोंजारी, नगरसेविका शोभा लोखंडे, तेजस्विनी सोनवणे, मनिषा विरकर आदी नगरसेवक उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)