अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला जामीन

मुंबई – लोअर परळच्या कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेतील अटकेत असलेल्या अग्निशमन अधिकाऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी अग्निशमन अधिकारी राजेंद्र पाटील यांना 45 हजारांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला.

डिसेंबर 2017मध्ये मुंबई-कमला मिल आग दुर्घटना प्रकरणी तपास करत असलेल्या पोलिसांनी वन अबोव्ह या रेस्टोपबला फायर सेफ्टी प्रमाणपत्र दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून पाटील यांना अटक केली. अटकेत असलेल्या पाटील यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या अर्जावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर आज सुनावणी झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी पाटील यांच्या वतीने युक्तीवाद करताना फायर सेफ्टी प्रमाणपत्र हे त्या जागेची पाहणी करून नियमाने दिले होते. त्यानंतर अंतर्गत रचनेत बदल करण्यात आला. याअतंर्गत रचनेला पाटील जबाबदार नाही, अशी बाजू मांडली. हा युक्तीवाद न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी ग्राह्य धरून पाटील यांना 45 हजार रूपयाचा जामीन मंजूर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)