“अगस्ती’चा पुरस्कार बनला उत्सवाचे निमित्त

अकोले: रौप्य महोत्सवी वर्षांमध्ये वाटचाल करणाऱ्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याने यापूर्वीच आपली कार्यक्षमता सिद्ध केल्याने, त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा तांत्रिक कार्यक्षमतेचा मिळालेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार हा उत्सवात रूपांतरित झाला आहे. काल या उत्सवाने अगस्ती सहकारी साखर कारखाना, अकोले शहर, अगस्ती आश्रम यांनी या उत्सवाच्या आनंदाचे शिंतोडे अंगावर झेलताना एक वेगळी यशस्वी औद्योगिक वाटचालीचे ते साक्षीदार बनले. अवघ्या तालुक्‍यानेही त्याची अनुभूती घेतली. अगस्ती सहकारी साखर कारखान्यात हा आनंदोत्सव साजरा होण्यापूर्वी अगस्ती आश्रमात अगस्ती ऋषींना अभिषेक घालून माजी मंत्री मधुकरराव पिचड व त्यांच्या सर्व संचालक मंडळाने आपली सर्व आनंदाची ही भक्ती अगस्ती चरणी अर्पण केली.

यावेळी उत्साहित झालेल्या कामगार व अधिकारी वर्गाने अगस्ती आश्रम, अकोले शहर, अगस्ती सहकारी साखर कारखाना अशी मोटारसायकल रॅली काढून व वेळोवेळी जय चा नारा लगाऊन आपला उत्साह व आनंद व्यक्त केला. कारखानास्थळावर आयोजित करण्यात करण्यात आलेल्या कामगार सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव पिचड होते. तर व्यासपीठावर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, आ. वैभवराव पिचड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक विकास देशमुख, अधिकारी पी. यू. देशमुख,महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी किसान सभेचे उपाध्यक्ष मधुकरराव नवले, कामगार नेते आनंदराव वायकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख व सर्व संचालक, सर्व खाते प्रमुख, अधिकारी, पदाधिकारी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी पंचवीस वर्षे कारखाना चालवणाऱ्या कामगार, अधिकारी यांचा यथोचित सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ऊस तोडणी कामगार, ट्रक चालक मालक, व्यापारी व योगदान देणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींचा यावेळी औचित्य पूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळेस बोलताना माजी मंत्री पिचड यांनी आपण निर्मितीचे काम केले. छोटी-मोठी धरणे बांधली. पाणी अडवून तालुक्‍याचा व शेतकऱ्यांचा फायदा पाहताना अगस्ती सहकारी साखर कारखाना स्वयंपूर्ण कसा बनेल यासाठी यशस्वी पावले टाकली, याकडे सर्वांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, कारखाना उभारणीच्या पूर्वी भंडारदरा धरणाच्या पाण्याचे वाटप करण्यासाठी आंदोलन छेडले. त्यातून बागायत उभे राहिले. त्याच वेळेस निळवंडे धरणाच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले.

अनेकांचा त्याला हातभार लागला. पण हे धरण बांधताना तालुक्‍याने यासाठी मोठा त्याग केला. या त्यागाचे व योगदानाचे लाभार्थिंनी विस्मरण होऊ देऊ नये असे सांगताना निळवंडे धरणाच्या पाण्यावरील अकोले तालुक्‍याचा हक्क शाबित होईपर्यंत आपण यापूर्वी जसे तालुक्‍याच्या हक्कासाठी लढलो तसाच यासाठी पुढे लढा देऊ. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर म्हणाले की, अगस्ती सहकारी साखर कारखाना उभारणी पासूनच तो बंद व्हावा यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते.

मात्र शेतकरी, कामगार, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्या यशस्वी योगदानामुळे हा कारखाना टिकला, सुव्यवस्थित चालला. आमदार वैभव पिचड म्हणाले, कारखान्याच्या गाळप कार्यक्षमतेत वाढ झाल्याने आपण यावर्षी चांगले गळीत घेऊ शकणार आहोत. कार्यक्षमता वाढीमुळे आपल्याला पुरस्कार मिळाला आहे. यापुढे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून ऊस वाढीचे उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. यावेळी व्हीएसआयचे संचालक विकास देशमुख, पी. यू. देशमुख, साईनाथ तरमळे, आनंदराव वायकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले आदींची भाषणे झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)