अखेर 110 शाळांमध्ये परिवहन समिती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परिवहन समिती स्थापन करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे वृत्त दैनिक “प्रभात’ने प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेऊन शहरातील 110 हून अधिक शाळांनी परिवहन समिती स्थापन केली केली आहे.

शहरात महापालिकेच्या 105 तर खासगी शाळा 427 असून त्या सर्व शाळांनी परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक असते. महापालिकेचा शिक्षण विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग व जिल्हा शालेय सुरक्षा समितीने या विषयासंबंधी झालेल्या बैठकीत तत्काळ समित्या नेमण्याचे आदेश खासगी शाळांना दिले होते. मात्र, या आदेशाकडे खासगी शाळांनी दुर्लक्ष केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असणारी बस वाहक सुरक्षिततेबाबत नियमांचे उल्लंघन करत असतात. यामुळे, शहरातील काही खासगी शाळा संबंधित विभागाची अंमलबजावणी करत नसल्याचे दिसून आले. याबाबत दैनिक “प्रभात’ने 24 ऑगस्ट 2018 रोजी सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेऊन शहरातील खासगी शाळांनी समितीची स्थापना केल्याचे सकारात्मक चित्र आहे. शहरातील महापालिकेच्या 105 शाळा असून त्या सर्व शाळात परिवहन समित्यांची स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नियमावली तयार करण्यात आली असून खासगी व महापालिका शाळांचे वाहन चालक या नियमांची अंमलबजावणी करत नसल्याचे दिसून आले. शहरात काही दिवसांपूर्वी एका शाळेच्या बसचा अपघात झाल्याने काही विद्यार्थी जखमी झाले होते. अशा घटना टाळण्यासाठी शालेय वाहतूक चालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्‍यकता आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत दक्ष राहण्याचे काम परिवहन समिती करत असल्याने शहरातील उर्वरीत खासगी शाळांना लवकरात-लवकर समित्या स्थापन करण्याबाबत पत्र दिल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)