अखेर सहा वर्षांच्या रवीला बोअरवेलमधून काढले

“एनडीआरएफ’च्या जवानांचे 17 तासांचे अथक परिश्रम

मंचर– जाधववाडी (ता. आंबेगाव) येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षांच्या रवी पंडित भिल या बालकाला तब्बल 17 तासांनी बोअरवेलच्या बाहेर काढण्यात “एनडीआरएफ’या जवानांना यश आले. गुरुवार (दि. 21) सकाळी 9 वाजून 1 मिनिटाने बालकाला सुखरूप बाहेर काढल्याने जाधववाडी ग्रामस्थांनी अक्षरश जल्लोष करत प्रशासनाचे आभार मानले.
जाधववाडी ते थोरांदळे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरी होते, त्यावेळी पंडित भिल या मजुराचा मुलगा रवी खेळताखेळता तेथील कोरड्या बोअरवेलमध्ये बुधवारी (दि. 20) दुपारी साडेचार वाजता पडला. पोलीस प्रशासन आणि “एनडीआरएफ’च्या जवानांनी लगेच बचाव कार्य सुरू केले; परंतु मुलाच्या शरीराच्या कमरेखालचा भाग हा कठीण खडकात अडकला होता. ब्रेकरच्या साह्याने खडक फोडून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न जवान करीत होते. मुलाच्या दोन्ही हातांना दोऱ्या बांधल्या होत्या, त्यामुळे त्याला बाहेर ओढताना वेदना होऊन तो रडत होता.बुधवारी रात्रभर बचाव कार्य सुरू होते. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक कृष्णा खराडे, जुन्नर तालुका शिवसेनेचे अध्यक्ष माऊली खंडागळे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, तहसीलदार सुषमा पैकेकरी, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, एनडीआरएफचे प्रमुख अलोक कुमार, जाधववाडी ग्रामस्थ आदींनी बचाव कार्यात मदत केली आणि गुरुवारी (दि. 21) सकाळी 9 वाजून 1 मिनिटाने रवी भिल या बालकाला बाहेर काढण्यात यश आले.

  • बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाच्या केविलवाण्या किंचाळ्या, त्याच्या वडिलांचा रडक्‍या सुरात त्याला दिलेला सततचा धीर, ब्रेकरच्या घरघरीनेच बुधवारची रात्र उजाडली. तब्बल 17 तासांनी सहा वर्षीय रवीला बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)