अखेर सरकारला जाग…मुंबई विमातळाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ’

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ, अशी सुधारणा मुंबई विमानतळाच्या नावात करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण उल्लेख नावात करण्यात आला आहे.

यापूर्वी विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव होते. दरम्यान या नावात बदल करून ‘महाराज’ या शब्दाची भर घालण्यात आली आहे.

अनके दिवसांपासून ही मागणी प्रलंबित होती. तसेच शिवप्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. अखेर सरकारला जाग आली आणि मुंबई विमानतळाच्या नावात बदल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)