अखेर शिवसेनेच्या लढ्याला यश

जिहे कठापूर योजनेचा कामाचा शुभारंभ

पुसेगाव – जिहे कठापूर पाणी प्रश्नी शिवसेनेने सुरू केलेल्या आंदोलनाला चौथ्या दिवशी यश मिळाले असून प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ शनिवारी दुपारी करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. जिहे कठापूर पाणीप्रश्नी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुसेगाव ते वर्धनगड बोगदा अशी पदयात्रा काढण्यात आली. गेली चार दिवस ठिय्या आंदोलन सुरू होते. गुरुवारी सर्वपक्षीय खटाव बंदला 100 प्रतिसाद मिळाला. आज सकाळी 12 वाजता बोगदा परिसरात मशिनरी येवू लागल्यामुळे शिवसैनिकामध्ये आनंदाचे वातावरण सुरू झाले.
शनिवारी दुपारी तीन वाजता श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती प. पू. सुंदरगिरी महाराज, दैनिक प्रभातचे पत्रकार प्रकाश राजेघाटगे, पुसेगाव पोलीस स्टेशनचे सपोनि संभाजीराव गायकवाड, सुमित्रा शेडगे, महिपत डंगारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वर्धनगड बोगद्याजवळ जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेच्या उर्ध्वगामी नलिकेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे, माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील, सातारा पाटबंधारे. प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय घोगरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, राष्ट्रीय कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, प्रा. भानुदास कोरडे, खटाव तालुकाप्रमुख दिनेश देवकर, उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, दिनेश बर्गे, माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी घाडगे, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त योगेश देशमुख, संजय घोरपडे, आकाश जाधव, आस्लम शिकल गार, सचिन गवळी, रामभाऊ लावंड, एन. पी. कदम, शिवाजी शिर्के, अमीन आगा यशवंत जाधव, रवी फाळके, संजय नांगरे, बाळासाहेब लावंड, संभाजी नलावडे, निखील राऊत, दिलीप नलवडे, सुरज जाधव, शालिनीताई घोरपडे, जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता संजय बोडके व अधिकारी व वर्ग तसेच शिवसेना, राष्टवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी. माहिला उपस्थित होत्या. गेली चार दिवस पुसेगाव पोलीस स्टेशनचे सपोनि संभाजीराव गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पुसेगाव पोलीसांनी वर्धनगड बोगदा
परिसरात व पुसेगाव परिसरात तास पहारा दिला. त्यामुळे आंदोलनाला कोणतेही गालबोट लागले नाही


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)