अखेर शरद पवार राफेल प्रकरणावर बोलले

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. काँग्रेस गेल्या काही दिवसांपासून राफेल प्रकरणावरून भाजपवर टीकास्त्र सोडत आहे. मात्र शरद पवार आतापर्यंत याबाबत गप्प होते. त्यामुळे राफेल प्रकरणावर शरद पवार गप्प का अशी चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती.

हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या शोकसभेला शरद पवार यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत सवांद साधला. राफेल विमान खरेदी देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. मी देखील संरक्षणमंत्री होतो, त्यामुळे राफेल खरेदीची तांत्रिक माहिती न देता किंमत सांगायला काहीच हरकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. सरकार ही माहिती गोपनीय असल्याचा दावा करत आहे. तंत्रज्ञानाचा भाग सोडून किंमत जाहीर करणे गरजेचे आहे. बोफोर्स प्रकरणात भाजप नेत्या सुषमा स्वराज आणि इतर नेत्यांनी अशाच प्रकारची मागणी केली होती. यामुळे यामध्ये गैर काही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)