अखेर लेखी आश्‍वासनानंतर घारगावकरांच्या आंदोलन स्थगिती

श्रीगोंदा – गेल्या पंधरा दिवसांपासुन चर्चेत आलेल्या तालुक्‍यातील घारगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी ग्रामस्थ व पालक यांच्या सामुहिक आत्मदहन इशारा चांगलाच गाजला. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांशी दुरध्वनीद्वारे चर्चा करून येत्या मार्च अखेरीस शाळा खोल्यासाठी निधी मंजुरी व 8 शाळा खोल्या बांधकाम सुरु करण्याची जबाबदारी घेवून तसेच लेखी आश्‍वासन दिल्याने ग्रामस्थांनी मार्चपर्यंत आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला.

गेल्या पाच महिन्यांपूर्वी श्रीगोंदा तालुक्‍यातील घारगाव येथील गावठाणातील 30 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पावसामुळे शाळा कोसळण्याची घटना घडली. या अगोदर ग्रामस्थांनी 24 सप्टेंबर रोजी शाळेची अवस्था जेमतेमचीच असुन शाळा खोल्या केव्हाही कोसळु शकतात अशा आशयाचे निवेदन शिक्षणमंत्र्यांपासुन सर्व संबंधित जिल्हा यंत्रणेला दिले होते. या शाळा इमारतीचे बांधकाम दगड मातीत तसेच ब्रिटीशकालीन असल्याने केव्हाही कोसळु शकते. शाळा कोसळल्यानंतर अघोषित तीन ते चार तास ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी 1 महिन्याच्या आत प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करुनही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थांनी दि.26 जानेवारीला सामुहिक आत्मदनहनाचा इशारा दिली होता.
त्या पार्श्‍वभूमिकवर सकाळपासून शाळे भोवती मोठा फौजफाटा तैनात केला होता. त्यामुळे शाळेला छावणीचेच स्वरुप आले होते. यानंतर सकाळी 9.30 दहाच्या सुमारास गावातील ग्रामस्थ व पालक प्रशासनाला दिलेल्या आत्मदहनाच्या ठिकाणी उपस्थित झाले. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. बेलवंडीचे पो.नि.पडवळ तसेच सहाय्यक पो.नि.हिवरकर यांनी ग्रामस्थांना प्रशासनाची बाजु समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतू ग्रामस्थ आपल्या भूमिकेशी ठाम राहिले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)