अखेर मोबाईल चोरटा पाचगणी पोलिसांच्या जाळ्यात

पाचगणी, दि. 26 (प्रतिनिधी) – चोरी करून गुंगारा देणाऱ्या मोबाईल चोरणाऱ्या गुन्हेगारास अखेर पाचगणी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान मोठ्या शिताफीने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अंकिता लक्ष्मीकांत कोळंमकर (रा. ठाणे) यांनी मोबाईल चोरी प्रकरणी फिर्याद दिली होती. त्यामध्ये कोळंमकर या फिरण्यास पाचगणी येथे आल्या होत्या. त्या पाचगणी -दांडेघर रस्त्याने सायकलवरून आपली सॅक पाठीला लावून जात असताना अचानक अज्ञात दुचाकीस्वाराने पाठीमागून येऊन सॅकला कप्यातून मोटोरोला कंपनीचा दहा हजार किंमतीचा मोबाईल हिसकावून घेत पळ काढला असल्याची अज्ञाता विरोधात फिर्याद एक महिन्यांपूर्वी दिली होती. त्यानुसार संशयित आरोपी किरण श्रीरंग पिसाळ (वय 25 रा. गोवेदिघर, ता. वाई) या गुन्हा प्रकरणी हवा असलेला गुन्हेगार अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. आज संशयित भोसेखिंड, ता. महाबळेश्वर परिसरात पोलीस पथक पेट्रोलिंग करताना एएसआ कदम, हवालदार अरविंद माने, कॉन्स्टेबल वैभव भिलारे, अभिजित घनवट यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्‍या दाखवीत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्यापासून मोटो-जी कंपनीचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल व आरोपीकडील हिरोहोंडा कंपनीची स्पेलेंडर एम.एच. 11 बी. आर. 5780 मोटारसायकल चाळीस हजार रुपये किंमतीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. त्याला कोर्टात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि तृप्ती सोनवणे यांचा मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार भुतकर करीत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)