अखेर मृत मुलाच्या कुटूंबियांना पीएमपीएमएलकडून आर्थिक मदत

पिंपरी – निगडीतील भक्ती-शक्ती चौकात बसची वाट पाहणाऱ्या रमन नाथाराम मोरे या तरुणाला पीएमपीएमएल बसने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या तरुणाच्या कुटूंबियांना पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. कडून (पीएमपीएमएल) आर्थिक मदत करण्यात आली आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी पीएमपीएमएल अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांना निवेदन देत आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेत पीएमपीएमएलने खैरनार यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अपघातग्रस्त बसवरील चालक संदीप अंबादास आंधळे यांचा सकृत दर्शनी निष्काळजीपणा व दोष दिसून आल्याने त्यांचे त्वरीत निलंबन करून त्याची खातेनिहाय चौकशी चालू सुरु आहे. ही घटना अत्यंत दुर्देवी असून महामंडळ त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात सहभागी आहे. संचालक मंडळाच्या ठरावानुसार महामंडळाकडून त्यांच्या वारसास तातडीची मदत म्हणून दोन लाख रूपयांचा धनादेश मृत तरुणाचे वडील नाथाराव अंबादास मोरे यांच्या नावे देण्यात आला असल्याची माहिती पत्राव्दारे कळवण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)