अखेर महापालिका प्रशासनाला जाग

पिंपरी – पिंपरी येथील महात्मा फुले स्मारकातील कारंजे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद होते. या कारंज्याच्या हौदात साचलेल्या पाण्यात डासोत्पत्ती होत होती. या बाबतचे वृत्त दैनिक “प्रभात’ने आठवड्यापूर्वी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची महापालिकेने तत्काळ दखल घेऊन कारंज्याच्या हौदातील साचलेले खराब पाणी काढून साफसफाई करण्यात आली.

महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्चून महात्मा फुले स्मारक उभारले आहे. मात्र, जयंती, पुण्यतिथी खेरीज स्मारकाचा विसर महापालिका प्रशासनाला पडतो. परिणामी स्मारक परिसराची रया गेली आहे. स्मारक उद्यानात लाखो रुपये महापालिका प्रशासनाने खर्च करुन कारंज्याचे दोन संच बसवण्यात आले आहेत. मात्र, ते कायम बंद अवस्थेत असायचे. त्यात गेल्या कित्येक महिन्यापासून स्वच्छ पाणी भरुन ठेवलेले होते. साठवलेल्या पाण्यावर शेवाळ आले असून पाण्यात डासोत्पत्तीची दाट शक्‍यता होती.

याकडे महापालिका प्रशासनाने पुर्णपणे दुर्लक्ष केलेले दिसून आले होते. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी स्मारक परिसरात येवून बसतात. मात्र, डास त्यांच्यावर अक्षरशः कडाडून हल्ला करायचे. एक-दोन मिनिट याठिकाणी थांबणे अवघड झाले होते. महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनाही या त्रासाला सामोरे जावे लागत होते. परंतु, “प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन साफसफाई केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)