अखेर मराठा समाजाकडून राजकीय पक्षाची स्थापना

पुणे: मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. गुरुवारी पाडव्याच्या मुहूर्तावर पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ असे या पक्षाचे नाव असून सुरेश पाटील यांनी ही घोषणा केली आहे. रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना करण्यात आली.

दरम्यान, मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. साताऱ्याचे खासदार उदयराजे भोसले यांचा या पक्षाला पाठिंबा आहे, असा दावाही सुरेश पाटील यांनी केला आहे. तसेच उदयनराजेंना आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची विनंती करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)