अखेर मगरीने ओढलेल्या मुलाचा मृतदेह सापडला

सांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने शुक्रवारी ओढून नेलेल्या मुलाचा मृतदेह अखेर हाती लागला आहे. या मुलाचा मृतदेह तब्बल 40 तासांनी शोधण्यात यश आले आहे. वन विभाग आणि बोट क्लबच्या वतीने सागर डंक या 14 वर्षाच्या  मुलाचा मृतदेहाचा शोध सुरु होता. अखेर तुंग पात्रात सागरचा मृतदेह सापडला.

पलूस तालुक्याच्या ब्रह्मनाळ गावातील कृष्णा नदीच्या पात्रात शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास काही मुले पोहत असताना, अचानक एका मगरीने सागर डंक नावाच्या मुलावर हल्ला करत त्याला पाण्यात ओढून नेले. सागर हा मूळचा बेळगाव इथला असून तो आपल्या मामाच्या गावी सध्या आला होता. मगरीच्या हल्ल्यानंतर आरडाओरडा सुरु झाल्याने ग्रामस्थांनी नदीकाठी धाव घेतली. परंतु तोपर्यंत मगर त्याला पाण्यात घेऊन गेली होती.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)