…अखेर बसस्थानकासमोरील खड्डा मुजला

चाफळ : बसस्थानकासमोरील बुजवण्यात आलेला हाच तो खड्डा.

समाजसेवकाकडून लोकप्रतिनिधींना चपराक

चाफळ, दि. 26 (वार्ताहर) – तीर्थक्षेत्र चाफळ, ता. पाटण येथील रामपेठेतील मुख्य रस्त्याची अक्षरश: वाट लागली असतानाही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. यावर ग्रामसभेतही जोरदार चर्चा करण्यात आली. मात्र पंधरा दिवसानंतरही बसस्थानकासमोर पडलेला मोठा खड्डा बुजविला गेला नाही. अखेर रविवारी समाजसेवक सुर्यकांत पाटील यांनी सदरचा खड्डा बुजवत लोकप्रतिनिधींना चांगलीच चपराक दिली.
तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराममंदीरास पर्यटनस्थळाचा ब वर्गाचा दर्जा आहे. रामपेठ याठिकाणी पर्यटन विकास निधीतून झालेल्या रस्त्याचे क्रॉक्रिटीकरण ठिकठिकाणी उखडल्याने पर्यटकासह नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत होता. बसस्थानक समोरचा रस्ता उखडून मोठा खड्डा तयार झाला होता. त्यामुळे वेगात येणारी वहाने या खड्ड्यात आपटून त्यांचेही नुुकसान होत होते. तर काही दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघातही याठिकाणी झाले आहेत. याबाबत आक्रमक होत नागरिकांनी हा मुद्या ग्रामसभेत मांडला होता. यावेळी लोकप्रतिनिधींनी सदरच्या रस्त्याची पंधरा दिवसात डागडुजी करण्याचे ग्रामसभेत आश्वासन दिले होते. मात्र महिना झाला तरी याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने अखेर समाजसेवक सुर्यकांत पाटील यांनी रविवारी युवकांच्या मदतीने सदरचा खड्डा सिमेंटच्या सहाय्याने बुजवून लोकप्रतिनिधींना चपराक दिली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)