अखेर बटाटा झाला स्वस्त

पिंपरी – पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत गेल्या आठवड्यात बटाट्याची आवक घटल्याने त्याचे भाव वधारले होते. पुण्याच्या मार्केटमध्ये मंगळवारी आणि बुधवारी मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने बटाट्याचे भाव पाच रूपयाने घसरले असल्याची माहिती भाजी विक्रेता आसिफ बागवान यांनी दिली.

पुण्याच्या मार्केटमध्ये मंगळवारी 30 गाड्या, बुधवारी 28 गाड्या आवक झाली. 25 रूपये किलो बटाटा झाल्याने सामान्याने बटाट्याकडे पाठ फिरवली होती. ग्राहकांनी पाठ फिरवल्याने काही अंशी विक्रेत्यांना त्याचा फटका बसला होता. पुढच्या महिन्यात बाजारात नवीन माल दाखल होणार आहे.

यामुळे हा माल लवकर विकावा लागणार आहे खराब झाला तर कोणीच घेणार नाही. परंतु, बाजारभाव जास्त असल्याने कमी भावाने विकता येत नाही. सध्या बटाटा बाजारात 17 ते 20 रूपये किलोने विकला जात असल्याचे बागवान यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)