अखेर फाटा क्रमांक 23 ला बेबी कालव्याचे आवर्तन सुरू

केडगाव- अखेर पाटबंधारे विभागाने केडगाव परिसरातील फाटा क्रमांक 23 ला बेबी कालव्याचे आवर्तन सोडल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
पावसाळा कमी झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. रब्बी हंगामातील गहू पेरणीचा काळ आणि ऊस पिके, त्याचबरोबर जनावरांची चारा पिके यासाठी पाण्याची आवश्‍यकता होती. केडगाव परिसरातून वाहणारा फाटा क्रमांक 22 जुन्या बेबी कालव्याच्या पाण्याने पंधरा दिवसांपासून भरून वाहत असताना फाटा क्रमांक 23 मात्र कोरडा पडला होता. याबाबत “दैनिक प्रभात’मध्येफाटा क्रमांक 22 वरील शेतकरी तुपाशी, 23 वरील उपाशी’ या मथळ्याखाली (दि. 1 डिसेंबर) सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेण्यात आली असून, फाटा क्रमांक 23 ला काल (दि. 6) बेबी कालव्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे, त्यामुळे शेतकरी बांधवानी समाधान व्यक्त केले असून, चालू आवर्तन पूर्ण क्षमतेने आणि जास्त दिवस ठेवल्यास त्याचा फायदा परिसरातील विहिरी आणि कूपनलिका यातील पाणी वाढण्यास होणार आहे.

  • सध्या पाणी कमी सोडले असले तरी मुठा उजव्या कालव्याचे पाणी या पाण्यात सोडण्यात येणार असून, पूर्ण क्षमतेने चालू आवर्तन दहा दिवस सुरू राहणार आहे, हे गृहीत धरून शेतकऱ्यांनी नियोजन करावे.
    -एम. एस. बनकर, पाटबंधारे उपविभागाचे अभियंता, यवत
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)