अखेर “पीएमपी’ने केला कर्मचाऱ्यांचा पगार

PMPML, Pune

पुणे – ऐन दिवाळी सणात कायमस्वरुपी कामगारांचा पगार न करणे “पीएमपी’ प्रशासनाला चांगलेच महागात पडले आहे. प्रशासनाने या कामगारांचा तब्बल 10 ते 11 दिवसांच्या विलबांनंतर पगार अदा केला आहे. त्यामुळे पाच हजार कामगारांचा जीव भांड्यात पडला आहे.

पीएमपीमध्ये वाहक, चालक, कार्यालयीन कामगार, अधिकारी आणि वर्कशॉपमध्ये असे मिळून सुमारे साडेबारा हजार कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी कार्यालयीन कामगार आणि अधिकारी यांचा पगार दरमहा 1, रोजंदारी कामगारांचा पगार दरमहा 5, आणि कायमस्वरुपी वाहक आणि चालकांचा पगार दर महिन्याच्या 10 तारखेला होत असतो. त्यातील 1 आणि 5 तारखेला होणारे पगार नियमित होत असले, तरी 10 तारखेला होणाऱ्या कायमस्वरुपी कामगारांच्या पगाराला नेहमीच विलंब होतो. या महिन्यात तर या कामगारांच्या पगारावर ऐन दिवाळीत संक्रांत कोसळली होती. याबाबत दैनिक “प्रभात’ ने 18 नोव्हेंबरच्या अंकात वृत्त दिले होते. हे त्यानंतर पीएमपी आणि महापालिका प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली होती. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी पीएमपी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन याविषयामध्ये गांभिर्याने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 19 तारखेला या कामगारांचा पगार देण्यात पीएमपी प्रशासनाला यश आले आहे. यासंदर्भात पीएमपीएमएल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)