अखेर “त्या’ रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू

हजारो वाहनधारकांना दिलासा
सातारा, दि. 5 (प्रतिनिधी) – येथील बसस्थानकाशेजारील प्रशासकीय इमारत रस्त्याच्या दुरूस्तीचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. दैनिक प्रभातने मागील आठवड्यात रस्त्याच्या दुरवस्थेचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर पालिकेच्या बांधकाम विभागाने बुधवारी दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.
बसस्थानकाशेजारील या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे वाहनधारकांना संकटाचा सामना करावा लागत होता. त्याचबरोबर पोवईनाका परिसरात सुरू असलेल्या ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची वाहतूक वळविण्यात आली होती. त्याचा परिणाम या रस्त्यावर देखील झाला होता. रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण येत असताना दुसऱ्या बाजूला खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे वाहनधारकांच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली होती. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा अपघात होता-होता राहिले होते. मात्र, बुधवारी पालिकेने खड्डे न मुजवता त्या ठिकाणचा रस्ता पूर्ण उकरून दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. हे काम येत्या दोन दिवसात पूर्ण होणार असून हजारो वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)