अखेर ‘त्या’ नराधम बापाला फाशी

नाशिक – आंतरजातीय विवाहाच्या रागापोटी गर्भवती मुलीची हत्या करणाऱ्या नराधम बापाला जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. 2013 मध्ये एकनाथ कुंभारकर याने रिक्षात बसलेल्या गर्भवती मुलीचा दोरीने गळा आवळून खून केला होता. या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीनंतर काल आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

गुन्हेगार आरोपी एकनाथ कुंभारकर याची मुलगी निशा हिने आंतरजातीय विवाह केला होता. यामुळे त्याने जून 2013 प्रमिला उर्फ निशा दीपक कांबळे या गर्भवती मुलीचा रिक्षात गळा आवळून निर्घृण खून केला होता. आई आजारी असल्याचे सांगून एकनाथ कुंभारकरनं मुलगी निशाला रिक्षात घेऊन गंगापूर रोडवर नेले. एका हॉस्पिटलजवळ रिक्षा थांबवून रिक्षा चालकास मुलीच्या आईला बोलवण्यास पाठवले. या संधीचा फायदा घेऊन आरोपीने निशाचा दोरीनं गळा आवळत निर्घृण खून केला होता. रिक्षा चालक प्रमोद आहिरे यांनी हा सर्व प्रकार पाहिला. त्याने मुलीस सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा आणि पोटातील गर्भाचाही दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी एकनाथच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रिक्षा चालक प्रमोद अहिरेची एकमेव साक्ष महत्वाची ठरल्याने नराधम बापाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)