अखेर तोतया पोलीस जाळ्यात

पिंपरी – पोलिसांची वर्दी घालून सोशल मिडीयावर हवा करणाऱ्या तोतया पोलिसाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 7) तक्रार दाखल करण्यात आली होती.

संदेश रामचंद्र जाधव (वय-21 रा. काळेवाडी गावठाण)असे अटक तोतया पोलिसाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदेश यांने बेकादेशीर रित्या पोलिसांची वर्दी घालून वॉटस ऍपवर त्याचे फोटो अपलोड केले होते. तसेच आपण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुरक्षा अधिकारी सेवेत रुजू झाल्याचेही सांगितले होते. मात्र पोलीस तपासात हे सारे खोटे असल्याचे समार आले.

यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी खाकी वर्दी, जाधव नावाची नेमप्लेट, कॅप, दोन स्टार, पीसीएमसीचे दोन बॅच असा एवज जप्त करण्यात आला आहे. यावेळी पोलीस वर्दीचा गैरवापर केल्या प्रकरणी संदेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याला मोरवाडी न्यायालयात शनिवारी हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)