अखेर तळेगाव चौकातील सिग्नलचा खांब बदलला

चाकण- येथील तळेगाव चौकातील वाहतूक नियंत्रक दिवा खांब वाहनाने दिलेल्या धडकेने गेली महिन्याभरापासून मोडकळीस आला होता. त्यामुळे हा खांब त्वरीत बदलावा अशी मागणी नागरिकांनी केली होत्यी त्यानुसार सोमवारी (दि. 23) रात्री उशीरा हा मोडकळीस आलेल्या खांब बदलण्यात आला.
पुणे-नाशिक महामार्गवरील तळेगाव चौक म्हणजे वर्दळीचे ठिकाण. या रस्त्याने जड, अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असतात. बऱ्याचवेळा सिग्नल बंद ठेवुनही वाहतूक नियंत्रित करण्याचे काम वाहतूक पोलीस करत असतात. दरम्यान, चौकातील हा सिग्नलचा खांब गेल्या महिन्याभरापासून एका बाजूला झुकला होता, तर एका बाजूचा दिशादर्शक बाण दाखविणारा दिवाही फुटला होता, तरीही त्याच्या दुरुस्तीकडे कोणाचेही लक्ष नव्हते. या खांबापासून ये-जा करणाऱ्या लोकांपेक्षा कधी-कधी खांबाखाली उभे राहणाऱ्या वाहतूक पोलिसांनाच या खांबापासून अधिक धोका निर्माण झाला होता, तरीही याची दखल कोणीच घेत नसल्याने पोलिसांसह प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, म्हणून खांब त्वरीत बदली करावा, अशी मागणी नागरिकांनी वारंवार केल्याने अखेर हा वाहतूक नियंत्रण दिव्याचा खांब बदलून टाकण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)