अखेर ठरले! शिवाजीनगर बसस्थानकाचे स्थलांतर

डेअरी फार्मच्या जागेतून चालणार कारभार


मुख्यमंत्र्यांनी दिली तत्वत: मान्यता, सुविधाही देणार

पुणे – शिवाजीनगर ते स्वारगेट या 5 कि.मी.च्या भुयारी मेट्रो मार्गात शिवाजीनगर येथील नियोजित मेट्रो स्टेशन तसेच ट्रान्सपोर्ट हबच्या कामासाठी हे बस स्थानक आता वाकडेवाडी येथील डेअरी फार्मच्या सुमारे 2 एकर जागेत स्थलांतरित केले जाणार आहे.

या स्थलांतरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी (महामेट्रो)चे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या स्थानकाचे स्थलांतर करायचे असल्याने महामेट्रोने कृषी महाविद्यालयाची जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील जागा निश्‍चित केली होती. त्याबाबत महाविद्यालयाशी बोलणेही सुरू होते. मात्र, ती जागा देण्याबाबत महाविद्यालय निर्णय घेत नसल्याने महामेट्रोने वाकडेवाडी येथील डेअरी फार्मच्या काही जागेची मागणी शासनाकडे केली होती. ती जागा देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिलेली असून येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर डेअरी फार्मच्या जागेत एसटीसाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देऊन स्थानकाचे स्थलांतर केले जाईल, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

वाहतुकीला पर्याय मिळाल्यानंतरच कर्वे रस्त्यावर काम
नळस्टॉप येथे होणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलाचे उद्‌घाटन महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र, त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेली नाही. कर्वेनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. प्रथम ती सोडवून मगच येथील कामाला सुरूवात करणार असल्याचे दीक्षित यांनी म्हटले. या रस्त्यावर दुहेरी, की सरळ वाहतूक व्यवस्था आणावी याचा विचारविनिमय सुरू असून ते ठरल्यानंतरच येथील कामाला गती देण्यात येणार आहे. नळस्टॉप येथे बॅरिकेडिंगनंतर रस्ता अरुंद होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन नागरिकांकडूनही सूचना मागविण्यात आल्याचे दीक्षित यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)