अखेर ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची उचलबांगडी

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल एच. आर. मॅकमास्टर यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय अध्यक्ष ट्रम्प यांनी घोषित केला आहे. त्यांच्या जागी अमेरिकेचे संयुक्तराष्ट्रातील माजी प्रतिनिधी जॉन बोल्टन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय महत्वाचा असून त्या खळबळजनक निर्णयामुळे व्हाईट हाऊस मध्ये सुरूवातीला काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पण स्वता अध्यक्षांनीच आपल्या ट्विटर अकौंटवर ही घोषणा केली. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना हलवले जाणार असल्याचे वृत्त मध्यंतरी प्रकाशित झाले होते त्यामुळे मोठीच खळबळ माजली होती. पण व्हाईट हाऊस मधून या वृत्ताचा लगोलग इन्कार करण्यात आला होता. पण आज खरेच त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

ही घोषणा करताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की बोल्टन यांची नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करताना आपल्याला विशेष आनंद होत आहे. विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार मॅकमास्टर यांचे कौतुकही करण्यास ते विसरले नाहीत. त्यांनी म्हटले आहे की त्यांनी अतिशय उत्तमपणे आपली जबाबदारी सांभाळली आहे आणि ते यापुढेही आपले मित्रच राहतील. नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे 9 एप्रिल पासून आपली सूत्रे सांभाळणार आहेत. अमेरिकेपुढे आज इराण आणि उत्तर कोरियाच्या प्रकरणांवरून मोठी आव्हानात्मक स्थिती असताना अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनात हा मोठा बदल केल्याने अमेरिका आता आंतरराष्ट्रीय विषयांवर अधिक आक्रमक भूमिका घेईल असा अंदाज लावला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)