अखेर जि.प.निवडणुकीत सेना,राष्ट्रवादी व कॉंग्रेसची युती

मुंबई: जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येणार हे जवळपास निश्‍चित आहे.
केवळ सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजप युती होण्याची चिन्हे आहेत. तर उस्मानाबाद, कोल्हापूर, नाशिक, नांदेड, सांगली आणि बीड या जिल्ह्यात स्थानिक समीकरणे जुळत नसल्याने शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत तीव्र मतभेद आहेत. त्यामुळे हे तीनही पक्ष या जिल्ह्यात एकत्र येण्याची शक्‍यता कमी आहे. त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी या तीन पक्षांची युती होणार हे जवळपास निश्‍चित आहे. मात्र ज्या जिल्ह्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत मतभेद आहेत, अशा जिल्ह्यात भाजप फायदा उचलण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि संपर्कप्रमुखांना जिल्हा परिषद अध्यक्ष बसवण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत चर्चा करण्याचे आदेश दिले होते. मात्र काही जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचे आदेश स्थानिक शिवसेना नेत्यांनी अमान्य केले आहेत. ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांच्याशी युती करण्यास स्थानिक आमदारांनी नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)