अखेर चिखली पोलीस ठाणे सुरू

पिंपरी – चिखली परिसरातील गुन्हेगारी व त्याचा व्याप पाहता 1 मार्च 2018 रोजी त्याचा शासनाकडून या परिसरात नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यात यावे, असा आदेश काढला होता. त्या आदेशानुसार चिखली पोलीस ठाणे अखेर सुरू झाले. या पोलीस ठाण्याचे उद्‌घाटन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते करण्यात आले.

चिखली पोलीस ठाणे हे पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालय हद्‌द्‌तील 15 वे पोलीस ठाणे असून पोलीस ठाण्याचे पहिले वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून विवेक मुगळीकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) म्हणून शंकर आवताडे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. या पोलीस ठाण्याच्या अतंर्गत कुदळवाडी, रुपीनगर व साने चौकी यांचा समावेश असून घऱकुल वसाहत चौकी ही प्रस्तावित चौकी येणार आहे. चिखली पोलीस ठाण्यासाठी सद्यस्थितीत एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक गुन्हे पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक व शंभर पोलीस कर्मचारी पुरवण्यात आले आहेत.

चिखली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे (निगडी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन) सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश सुरेश कांबळे (पिंपरी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन) सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश जगन्नाथ जगदाळे (निगडी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन) पोलीस उपनिरीक्षक संदीप अशोक बागुल (निगडी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन) पोलीस उपनिरीक्षक योगेश भास्कर शिंदे (निगडी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन) पोलीस उपनिरीक्षक भरत विठ्ठलराव चपाईतकर (पिंपरी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन)महिला पोलीस उपनिरीक्षक रत्नमाला त्र्यंबकराव सावंत (एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन) पोलीस उपनिरीक्षक मधुसुदन आर. घुगे (पिंपरी पोलीस स्टेशन ते चिखली पोलीस स्टेशन) या नवीन अधिकाऱ्यांच्या चिखली पोलीस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलीस ठाणे सुरू झाले असले तरी अद्याप आयुक्‍तालयाकडे श्‍वान पथक, बॉम्ब शोधक पथक, सायबर सेल अशा महत्त्वाचे विभाग अद्यापही कार्यरत झाले नाहीत, याची खंत व्यक्‍त केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)