अखेर गोवा लेखापाल विभागाला सदबुद्धी… उत्तरपत्रिकांचे होणार पुनः परीक्षण 

गोवा: राज्यातील लेखापाल विभागाने ‘अकाउंटंट’ भरतीसाठी परीक्षेस बसलेल्या सर्वच्या सर्व ८००० विध्यार्थ्यांना नापास केल्याच्या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर अखेर आज गोवा लेखापाल विभागाला जाग आली असून परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुन्हा एकदा परीक्षण होणार असल्याची घोषणा विभागातर्फे करण्यात आली आहे.
तत्पूर्वी गोवा लेखापाल विभागाचे संचालक प्रकाश पेरेरा यांनी २१ ऑगस्ट रोजी एका सूचनेद्वारे घोषित केले होते की लेखापाल भरतीसाठी बसलेल्या ८००० विद्यार्थ्यांपैकी एकही विध्यार्थी परीक्षेमध्ये पास होऊ शकला नाही.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)