अखेर ख्रिस गेलला खरेदीदार मिळाला

बंगळुरु : आयपीएल २०१८ च्या लिलावात खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लावली गेली. मात्र, स्टार बॅट्समन ख्रिस गेलला पहिल्या दिवशी कुणीच खरेदी केले नव्हते. पण आता गेलची लॉटरी लागली असून त्याला खरेदीदार मिळाला आहे. पण पहिल्या दिवशी त्याला कुणीही खरेदीदार न मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

दरम्यान, ख्रिस गेलला खरेदीदार न मिळाल्याने गेलचा जलवा पुन्हा पहायला मिळणार नाही असे सर्वांनाच वाटत होते. पण आता गेलला खरेदीदार मिळाल्याने पुन्हा एकदा रेकॉर्ड्स आणि सिस्करचा पाऊस पडणार असल्याचे दिसत आहे.
वेस्ट इंडिजचा स्टार बॅट्समन असलेल्या ख्रिस गेलला किंग्स इलेव्हन पंजाबच्या टीमने खरेदी केले आहे. ख्रिस गेल याची बेस प्राईस दोन कोटी होती आणि त्याला पंजाबच्या टीमने दोन कोटी रुपयांत खरेदी केले आहे. आयपीएल लिलावामधील दुसऱ्या दिवसाच्या पाचव्या राऊंडमध्ये तिसऱ्यांदा बोली लागली आणि पंजाबने गेलला खरेदी केले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)