…अखेर “एजीओ’ कंपनीतील कामगारांना बोन

 

पिंपरी- पिंपरी, नेहरुनगर येथील कायमस्वरुपी कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने कंपनीतील 100 कामगारांना 16 हजार 400 रुपये बोनस मिळाला आहे. यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे “एजीओ’ कामगार संघटनेचे खजिनदार हनुमंत (बाळा)शिंदे यांनी सांगितले.

पिंपरी, नेहरुनगर येथे ‘एजीओ’ फार्मास्युटीकल कंपनी आहे. या कंपनीत 100 कामगार कायस्वरुपी आहेत. कंपनीतील “एजीओ’ कामगार संघटना आणि व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींची अनेक दिवसांपासून बोनसबाबत चर्चा सुरु होती. बोनस किती द्यायचा यावर तोडगा निघत नव्हता. त्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी यामध्ये पुढाकर घेतला. संघटनेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापनच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत कामगारांना 16 हजार 400 रुपये बोनस देण्याचे निश्चित झाले.

यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पंकज चांडक, कामगार नेते सचिन लांडगे, संघटनेचे अध्यक्ष विलास बालवडकर, उपाध्यक्ष रतन नांदुरकर, खजिनदार हनुमंत (बाळा)शिंदे, दिपक मोळक, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर नेवाळे, शिवराज पाटील, मानव संसाधन विभाग (एचआरचे) जयदीप शिंदे उपस्थित होते.
“एजीओ’ कामगार संघटनेचे खजिनदार हनुमंत (बाळा) शिंदे म्हणाले की, ‘बोनस मिळवून देण्याबाबत आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. कंपनी व्यवस्थापनानेही सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे गतवर्षीपेक्षा दोन हजार रुपये बोनस अधिक मिळाला आहे. 2016 मध्ये 12 हजार, 2017 मध्ये 14 हजार 400 रुपये आणि 2018 मध्ये 16 हजार 400 रुपये बोनस मिळाला आहे’.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)