अखेर “एआरके’चा रस्ता बंद

वडगाव मावळ- वन विभागाच्या हद्दीतून धनिक व उद्योगांना खासगी रस्ता दिल्याचे वृत्त दैनिकै”प्रभात’ने प्रसिद्ध केले होते. या बातमीची वडगाव मावळ वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयाने तत्काळ दखल घेऊन एआरके इंडस्ट्रीजचा वनक्षेत्राच्या हद्दीतून जाणारा रस्ता बुधवार (दि. 31) दुपारी खोदकाम करून रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे, निसर्ग व प्राणीप्रेमींनी समाधान व्यक्त केले.

धामणे गावच्या हद्दीतील एआरके इंडस्ट्रीजला वन परिक्षेत्रातून रस्ता दिला होता. त्या रस्त्याने हद्दीतील वनराई नष्ट झाल्याने वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. वन परिक्षेत्राच्या हद्दीतील रस्ता त्वरित बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण घारे यांनी केली होती.
धामणे हद्दीतील चांदखेड रस्ता येथील एआरके इंडस्ट्रीज असून त्या इंडस्ट्रीजमध्ये लोखंडी जॉब कटींग केले जातात. त्याच्या वाहतुकीसाठी वनक्षेत्रातून रस्ता दिला होता. या वन क्षेत्रात सांबर, भेकर, मोर, लांडोर, ससे, कोल्हे, माकड, वानर, रानडुक्कर, पिसोर आदी वन्यजीव वास्तव्यास आहेत. वनक्षेत्राच्या हद्दीतून एआरके इंडस्ट्रीजला रस्ता दिल्याने वन व वन्यजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता. तसेच, चांदखेड ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना वनविभागाने त्यांच्या हद्दीतून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकू दिली नाही. मात्र, एआरके इंडस्ट्रीजला रस्ता कसा दिला याची परिसरात चर्चा होती. या इंडस्ट्रीजच्या बाजूलाच धनिकांचे फॉर्म हाऊस असून त्यांनाही रस्ता दिला होता. वन विभागाच्या हद्दीतून दिलेला एआरके इंडस्ट्रीजला रस्ता खोदून पूर्णपणे बंद केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वडगाव मावळ वनपरिक्षेत्राधिकारी सोमनाथ ताकवले म्हणाले, एआरके इंडस्ट्रीजची वाहतूक वनविभागाच्या हद्दीतून होत असल्याने त्या इंडस्ट्रीजचा रस्त्यात बुधवारी वनरक्षक सुनील भुजबळ यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्या जागेवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच, वनक्षेत्राच्या हद्दीतील झालेलं अतिक्रमण त्वरित काढण्याची कारवाई सुरु करणार आहे.
एआरके इंडस्ट्रीज व्यवस्थापक मंगेश शितोळे म्हणाले की, वन विभागाने आमचा रस्ता पाच ते सहा वेळा बंद केला आहे. रस्त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)