अखेर उच्च न्यायालयाने एकबोटेंची याचिका स्वीकारली

मुंबई : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेंची याचिका ऐकण्यास न्या. भूषण गवई आणि बी पी कुलाबावाला यांच्या खंडपीठानं नकार दिला होता. न्यायाधिशांनी एकबोटेंना दुस-या खंडपीठापुढे जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मिलिंद एकबोटे यांनी आपली याचिका आता न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सादर केलीय त्यावर  शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

१ जानेवारीला कोरेगाव भीमा इथं शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जात असलेल्या लोकांवर सणसवाडी इथं दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला होता  त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी चिथावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला  आहे. दरम्यान   एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून  दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत.दरम्यान आता या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)