अखेर उघड्यावर पडणाऱ्या सांडपाण्याचा बंदोबस्त

“दै. प्रभात’च्या वृत्तानंतर झेडपीतील सांडपाण्याची पाईप बदलली

सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूस सांडपाणी वाहणाऱ्या पाईपलाईनमधून शौचालयाचे पाणी उघड्यावरच पडत असल्याचे सचित्र वृत्त दै. प्रभातने प्रसिद्ध केले होते. जिल्हा परिषदेच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी याची तातडीने दखल घेवून सांडपाणी पाईपलाईनची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानुसार उपाहारागृहशेजारील सांडपाणी व्यवस्थापन करणारी पाईप बदलली आहे. त्याला आवश्‍यक असणारे सॉकेट बदलून बसवले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगची पाईपही नव्याने बसवली आहे. जि. प.चे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केल्याची माहिती सहायक अभियंता शेख यांनी दिली.

सांडपाणी उघड्यावरच पडत असल्याने शेजारील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला होता. वॉश बेसीनशेजारीच ही सांडपाणी वाहन करणारी नलिका तुटली होती. उघड्यावरच दैनंदिन स्वरूपात कमी अधिक प्रमाणात पाणी वाहत होते.

या उपहारगृहामध्ये जेवण नाष्टा तसेच चहा घेण्यासाठी मोठ्या स्वरूपात नागरिकांची गर्दी असते. जेवण करून हात धुण्यासाठी बाहेर आल्यास कायमच दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. दैनंदिन होणाऱ्या या समस्येची बातमीच्या माध्यमातून सोडवणूक झाल्याने येथे येत असलेल्या नागरिकांनी या बाबत दै. प्रभातचे आभार मानले. जिल्हा परिषदेच्या सांडपाणी वाहन करणाऱ्या नलिकांची दुरूस्ती यामुळे प्राधान्याने करणे गरजेचे बनले आहे. या प्रश्‍नाची सोडवणूक करताना भविष्यात सांडपाणी व्यवस्थापन करण्याच्या जुन्या पाईप काढून नवीन बसवणे आवश्‍यक बनले आहे. यासाठी संबधित विभागाने कायमस्वरूपी तरतूद करणे
आवश्‍यकच आहे.

सांडपाण्याचे योग्य नियोजन गरजेचे
सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातून भुयारी गटार योजना शहरात कार्यान्वित करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या सांडपाणी व्यवस्थापनाकरिता सातारा नगर परिषदेच्यावतीने सुयोग्य व्यवस्था केली पाहिजे. यासाठी जिल्हा परिषदेने देखील पुढाकार घेऊन सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजन केले पाहिजे. येत्या काळात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद उपविधीच्या नियमांचे पालन करताना कारवाईचा अवलंब केल्यास असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)