अखेर आयोगाला नामविस्ताराचे “स्मरण’

“प्रभात’च्या वृत्तानंतर जाग : “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा उल्लेख


यापूर्वी “युनिव्हर्सिटी ऑफ पुणे’ असाच होत होता नामोल्लेख

– व्यंकटेश भोळा

पुणे – पुणे विद्यापीठाचे “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा नामविस्तार होऊन चार वर्षे उलटली, तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या यादीत अजूनही “युनिव्हर्सिटी ऑफ पुणे’ असाच नामोल्लेख असल्याचे वृत्त दै. “प्रभात’ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आयोगाने आता त्यांच्या संकेतस्थळावर “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड रस्ता, पुणे’ असे यादीत नमूद केले आहे. त्यामुळे अखेर आयोगाला पुणे विद्यापीठ नामविस्ताराचे “स्मरण’ झाल्याचे दिसून आले.

महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, ज्यांनी राज्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली, अशा सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुणे विद्यापीठाचे नामविस्तार मोठ्या थाटात झाले. विद्यापीठाचा “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा नामविस्तार 31 जुलै 2014 रोजी झाला. त्यास चार वर्षे पूर्ण झाली तरी आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर असलेल्या देशातील विद्यापीठ व संस्थांच्या यादीत केवळ “पुणे विद्यापीठ’ असाच उल्लेख केला होता. ज्या नावावरून महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली, त्याच नावाचे आयोगाला वावडे आहे? असा प्रश्‍न उपस्थित होत होता. याकडे दै. “प्रभात’ने दि. 17 ऑक्‍टोबर रोजी “लोकसेवा आयोगाला नामविस्ताराचा विसर’ असे वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले. त्याची दखल घेत सुधारित विद्यापीठांची यादी आयोगाने नुकतेच जाहीर केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या स्पर्धा परीक्षेतूनच शासकीय व प्रशासकीय सेवेत निवड केली जाते. त्यामुळे स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या दृष्टीने आयोगाचे संकेतस्थळ महत्त्वाचे आहे. परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे, निकाल कधी लागणार आहे, नवे निर्णय याची सर्व माहिती उमेदवारांना संकेतस्थळावर प्राप्त होत आहे. त्यादृष्टीने आयोगाचे संकेतस्थळाद्वारे अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न असतो. मात्र, आयोगाचे संकेतस्थळाच्या “होम पेजवर’ देशातील अधिकृत विद्यापीठे व संस्थांची यादी आहे, त्यात पुणे विद्यापीठाचा नामविस्ताराचे उल्लेख नसल्याने सर्वत्र टीका होत होती. त्यानंतर आयोगाने सुधारित यादी नुकतीच प्रसिद्ध केली. त्यात पूर्वी 958 विद्यापीठांचा समावेश होता. आता सुधारित यादीत देशातील 903 विद्यापीठांचा समावेश केला आहे.

बनावट विद्यापीठाला कात्री
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असा उल्लेख करीत पत्त्यासह विद्यापीठाची नव्याने यादी जाहीर केली आहे. यात काही विद्यापीठाचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे बनावट विद्यापीठाला कात्री बसली आहे. परिणामी, या विद्यापीठांतून पदवी घेतलेले विद्यार्थी आयोगाच्या परीक्षेसाठी अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे आयोगाने उशिरा का होईना सुधारित यादी प्रसिद्ध करून पुणे विद्यापीठ नामविस्ताराचा समावेश केल्याचे स्वागत होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)