अखेर अनिल कुमार सिंग यांचं बसपमधून निलंबन

लखनऊ – उत्तर प्रदेशात भाजपने  बसप आणि सपाला जोरदार धक्का देत राज्यसभेत आपले १० पैकी ९ उमेदवार निवडून आणले.भाजपचे  उत्तर प्रदेशात ८ उमेदवार निवडून येणं अपेक्षित होतं. मात्र भाजपनं  बसप आणि सपाच्या मतांमध्ये फाटाफूट घडवून अनिल अग्रवाल यांच्या रुपाने आपला नववा उमेदवारही निवडून आणला. त्यासाठी भाजपला मदत करणाऱ्या  बसप नेता अनिल कुमार सिंग यांना बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पक्षातून निलंबित केले.

दरम्यान, प्रतिस्पर्धी पक्षांचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप मायावतींनी केला. भाजपच्या बाजूने मतदान करणारे आमदार अनिल कुमार सिंग यांना मायावतींनी आज पक्षातून निलंबित केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)