इंधन भडक्‍यामुळे मेटाकुटीला आलेल्या सामान्य जनतेला दरवाढीतूून मिळालेला दिलासा एक दिवसापुरताच मर्यादित ठरला. मागील काही दिवसांपासून सलगपणे सुरू असलेले पेट्रोल, डिझेल दरवाढीचे सत्र बुधवारी थांबले. मात्र, गुरूवारी पुन्हा त्या इंधनांमध्ये लिटरमागे अनुक्रमे 13 आणि 11 पैशांची वाढ झाली.

दरवाढीमुळे देशाची राजधानी दिल्लीत प्रथमच पेट्रोलची किंमत 81 रूपये झाली. तर डिझेल दराने नवा उच्चांक गाठत 73.08 रूपयांवर उडी घेतली. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 88.39 रूपयांवर तर डिझेल 77.58 रूपयांवर पोहचले. मुंबईत दोन्ही इंधनांवर देशातील इतर महानगरांपेक्षा सर्वांधिक कर आकारला जातो. दिल्लीत इतर महानगरांपेक्षा सर्वांत कमी इंधन दर आहेत.

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका येथील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत. मोदी सरकारला ‘कुठे गेले अच्छे दिन ?’, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)