अखेरच्या षटकांमधील विंडीजची फलंदाजी महत्वपूर्ण ठरली – जसप्रीत बुमराह

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर सामन्यात चार बळी मिळवणारा भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याने सामन्यानंतर भारतीय संघाच्या पराभवाचे विश्‍लेषण करताना सांगितले की, वेस्ट इंडिजच्या तळातील फलंदाजांनी केलेली चांगली फलंदाजी दोन्ही संघातील अंतर राहिली आणि त्यामुळे ते हा सामना जिंकू शकले.

वेस्ट इंडिजची धावसंख्या एकवेळ 8 बाद 227 अश्‍या स्थितीत होती. परंतु, अखेरच्या काही षटकांमध्ये ऍश्‍ले नर्स (40) आणि केमार रोच यांनी केलेल्या भागीदारीमुळे विंडीजने आपली धावसंख्या 283 धावांपर्यंत नेली. त्यामुळे एकवेळ 250 धावांचाच आम्हाला पाठलाग करावा लागेल असे वाटत असताना आमच्या समोर 284 धावांचे लक्ष्य होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“मला वाटते आमच्या गोलंदाजांनी 40व्या षटका पर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. परंतु, त्यानंतर आम्ही शेवटच्या षटकांमध्ये भरपूर धावा दिल्या आणि त्याच आम्हाला महागात पडल्या. एकंदरीत आमची गोलंदाजीतील कामगिरी ही खूप खराब झाली नाही परंतु विंडीजच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्याचे श्रेय त्यांना दिले गेले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)