अखेरच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा

विशाखापट्टणम: वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून या तीन सामन्यांसाठी निवड करण्यात आलेल्या संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्‍वर कुमार यांचे संघात पुन्हा पुनरागमन झाले आहे. आशिया क्रिकेट स्पर्धेनंतर बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसोबतच वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी देखिल या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. तर, आगामी तीन सामन्यांसाठी मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलेले नाही. शमीने पहिल्या सामन्यात 10 षटकात 2 गडी बाद 81 धावा दिल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात 10 षटकात केवळ 1 गडी बाद 59 धावा दिल्या होत्या.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू असून मालिकेत आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. गुवाहटी येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 8 गडी राखून विजय मिळवला होता. तर, विशाखापट्टणम येथील सामन्यात दोन्ही संघाची धावसंख्या समान झाल्याने हा सामना टाय (बरोबरीत) सुटला. मालिकेतील तिसरा सामना 27 ऑक्‍टोबर रोजी पुण्यात होणार आहे. तर, चौथा सामना 29 रोजी मुंबईत होणार असून अखेरचा सामना थिरुवनंतपूरम येथे होणार आहे. पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका संपल्यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार असून टी-20चा पहिला सामना 4 नोव्हेंबर रोजी कोलकातामध्ये, दुसरा सामना 6 नोव्हेंबरला लखनऊ आणि तिसरा व अखेरचा सामना चेन्नईत 11 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

असा असेल भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, केएल. राहुल, जसप्रित बुमराह आणि उमेश यादव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)