अखेरच्या कसोटीनंतर ऍलिस्टर कूक निवृत्त होणार

लंडन: इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी करणारा अनुभवी सलामीवीर आणि माजी कर्णधार ऍलिस्टर कूक भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती स्वीकारणार असल्याची माहिती आयसीसीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. मात्र कूकने घेतलेल्या या अनपेक्षित निर्णयाने त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.

आता माझ्यात क्रिकेट शिल्लक राहिलेले नाही. मला क्रिकेटने अपेक्षेपेक्षा खूप काही अधिक दिले. इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना अनेक महान खेळाडूंचा मला सहवास लाभला हे माझे भाग्यच आहे, असे सांगत कूकने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. कूकने सर्वाधिक 59 कसोटींमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत चांगली कामगिरी करता आली नसल्यामुळे कूकने निवृत्तीचा निर्णय घेतला असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

भारताविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत कूकला एकदाही अर्धशतकी मजल मारता आली नाही. त्याने चार कसोटी सामन्यांमध्ये सात डावांत मिळून केवळ 109 धावा केल्या आहेत. हेच अपयश त्याच्या जिव्हारी लागले असल्याचे बोलले जात असताना कूकने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. कूकने 160 कसोटी सामन्यांमधील 289 डावांत 44.88 सरासरीने 12,254 धावा केल्या असून 32 शतके आणि 56 अर्धशतके त्याच्या नावावर जमा आहेत.

इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान कूकने पटकावला आहे. भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यानंतर कूक निवृत्ती पत्करणार आहे. त्यामुळे आपल्या अखेरच्या कसोटी सामन्यात कूक कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंड व भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना 7 सप्टेंबर रोजी लंडनमध्ये सुरू होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)