अखिल शिवतेज “गणराया अवॉर्ड’चा मानकरी

  • लोणीकंद पोलिसांचा उपक्रम : विविध उपक्रमांमुळे मारली बाजी

वाघोली – वाघोली (ता. हवेली) येथे अखिल शिवतेज तरुण मंडळास लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात येणारा “गणराया अवॉर्ड’ नुकताच प्रदान करण्यात आला.
यावेळी पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस सर्जेराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना कटके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष शांताराम कटके, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील तसेच विविध गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अखिल शिवतेज तरुण मंडळाने गणेशोत्सव मिरवणुकीला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत पोलिसांच्या निर्भया अभियानास दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करून महिलांसाठी आरोग्य शिबिर राबवून गरजू व गरीब मुलांना मोफत शालेय वह्या व साहित्याचे वाटप केल्याबद्दल व कोणतही वाद्य न वाजवता मिरवणूक काळात मिरवणूक वेळेअगोदर काढून पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल केसनंद फाटा येथील अखिल शिवतेज तरुण मंडळास लोणीकंद पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या “गणराया अवॉर्ड’चे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
याशिवाय 150 युवकांचे रक्‍तदान शिबिर आयोजित करून प्रत्येक रक्तदात्यास एक झाड व इतर साहित्य भेट देऊन 3000 लोकांना अन्नदान व अंध मुलाचा सांस्कृतिक कार्यक्रम आजोजित करून मिरवणूक पारंपरिक वाद्य यांच्या साहाय्याने करून आदर्श उभा केल्याबद्दल गाडेवस्ती वरील जय भवानी मित्र मंडळास द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. तर महिलांसाठी महिला दिनानिमित्त महिलांना साडी वाटप तसेच मोफत देवदर्शन यात्रा, गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप पारंपरिक वाद्याद्वारे मिरवणूक व गुलाल विरहित मिरवणूक काढल्याबद्दल श्री दत्त स्पोटस क्‍लब वाघोली या मंडळास तृतीय क्रमांकाचा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अबीद शेख, सुमित गाडे, चिराग सातव पाटील, सागर कड, युवराज दौंडकर, संतोष कटके, संभाजी केदार, चंद्रकांत गाडूते, मुकेश सातव, संजय गव्हाणे, बाळासाहेब उंद्रे, राहुल काळे, दीपक कुळाल, समीर चव्हाण, अतुल चोरडिया, संतोष सातव, जितेंद्र कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)